मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटाने भर पावसात शहरातील प्रमुख मार्गावरुन दूचाकी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. महिला, युवक, युवती यांच्यासह हजारांच्या संख्येने रॅलीत कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
क्रांती दिनाचे औचित्य साधत क्षीरसागर गटाकडून शहरातील प्रमुख मार्गावरुन दूचाकी क्रांती रॅलीचे आयोजन केले होते. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक मैदानातून रॅलीस प्रारंभ झाला. पुढे स्वयंभु गणेश मंदिर, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन, माळकर तिकटी मार्गे रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना क्षीरसागर म्हणाले, 2019®³ee विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आघाडी केली. हे चुकीच पाऊल उचलण्यात आले. सत्तेत असताना नवाब मलिक यांना समर्थन करण्याची वेळ आली. हिंदूत्वाच्या अनेक मुद्दांवर व्यक्त होता येत नव्हत. त्यामुळे सत्तेत असूनही शिवसैनिकांची घुमसट होत होती. हि घुसमट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बाहेर पडली. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत झालेल्या क्रांतीच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी शहरातून हि भव्य रॅली काढत मुख्यमंत्र्यांना पाठबळ दिल्याचं क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब घाटगे, अरुण सांवत, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, सुजित चव्हाण, जयवंत हारुगले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहूल चव्हाण, अजित मोरे, राजू हुंबे, शिवाजीराव जाधव, पियुष चव्हाण, सुनील जाधव, दिशा क्षीरसागर, मंगल साळोखे, पुजा भार, पुजा कामते, सपल रेळेकर, सपना शिंदे, मंगल कुलकणी, रुपाली कवाळे, सोनाली साळोखे आदींसह कार्यकर्ते मोठयासंख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत
ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर क्रांती ज्योती प्रज्वलीत करुन क्रांती रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित केली. यानंतर पुढे रॅली मार्गस्थ झाली.
रॅली मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त
क्रांती रॅली कडेकोट पोलीस बंदोबस्तात निघाली. अनुचित प्रकार घडु नये यासाठी रॅली मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजा चौकात पोलीस अधिकारीही उपस्थित होते.