संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव ग्रामपंचायतीत कॉंग्रसने सत्ता राखली आहे. सतेज पाटील गटाने सत्ता कायम राखत धनंजय महाडिक गटाचा पराभव केला आहे. याआधीही पाचगावात कॉंग्रेसची सत्ता होती.काँग्रेसच्या प्रियांका पाटील या विजयी झाल्या आहेत. धनंजय महाडिक गटाचा सत्तांतराचा प्रयत्न अयशस्वी झाला. शिवाय कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात शिंदे गटाला पराभव पत्करावा लागला आहे.राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवून लावली.
शिनोळी गावात एकूण 9 पैकी 7 जागा जिंकत राजेश पाटील आणि भरमु सुबराव यांनी गावातील सत्तेला हादरा दिला आहे. शिनोळी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रचार केला होता. शंभूराज देसाई यांनी निवडणुकीत प्रचार केल्याने सर्वांच्या नजरा या निवडणुक निकालाकडे लागल्या होत्या.मात्र याठिकाणी राष्ट्रवादीने बाजी मारली आ

