नवी दिल्ली : माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर चौकशी सुरू असलेल्या युनिफिकेशन चर्चशी संबंधीत एका जपानी मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आर्थिक पुनरुज्जीवन मंत्री असलेले दाशिरो यामागीवा यांचे चर्चच्या व्यवस्थापनाशी असलेले संबंधांचे स्पष्टीकरण देता आले नसल्याने त्यांच्यावर दबाव वाढत होता.वाढत्या टीकेनंतर शेवटी त्यांनी राजीनामा दिला. आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्याचा राजीनामा हा पंतप्रधान फुमियो किशिदा यांना मोठा धक्का मानला जातो. संबंधित चर्चचे नाव न घेता यामागीवा यांनी आपल्यावरील आरोपांचा संसदीय चर्चेवर परिणाम होऊ नये असे म्हटले आहे.