उपाध्यक्षपदी जयसिंग माने
प्रतिनिधी/कोल्हापूर
दि. कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शिरिष कणेरकर यांची तर उपाध्यक्षपदी जयसिंगराव माने यांची निवड झाली. निवडणू निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली.
कोल्हापूर अर्बन बँकेच्या 15 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत शिरिष कणेरकर यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ जुने शिंदे-कणेरकर पॅनेल व विरोधी उमेश निगडे यांच्या संस्थापक पॅनेलमध्ये थेट लढत झाली होती. पंधरा जागेसाठी 35 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सत्तारुढ जुने शिंदे-कणेरकर पॅनेलने 15 पैकी 15 जागा जिंकत बँकेवरील वर्चस्व कायम ठेवले. निवडणुकीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बँकेच्या प्रधान कार्यालयात सोमवारी निवड प्रक्रिया झाली. यामध्ये ज्येष्ठ संचालक शिरिष कणेरकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी जयसिंगराव माने यांची निवड झाली. कणेरकर यांना संचालक सुभाष भांबुरे सुचक तर अनुमोदक संचालक विश्वास काटकर यांनी दिले. तर माने यांना संचालिका सुनिता राऊत सूचक आणि संचालिका संध्या घोटाणे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष कणेरकर 1981 पासून बँकेत प्रतिनािधित्व करत आहेत. यापूर्वी दोनदा त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.