Tarun Bharat

शिरोडा भाजपातर्फे योगदिन साजरा

प्रतिनिधी /शिरोडा

शिरोडा भाजपा मंडळ व भाजपा युवा मोर्चातर्फे थळ शिरोडा येथील महामाया मंदिरच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या योगसत्रात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, अनिवासी भारतीय आयुक्त तथा माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, शिरोडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक, शक्तीकेंद्र प्रमुख अमित शिरोडकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष ब्रिजल नाईक, स्कूल ऑफ सिमबायोसिसचे मुख्याध्यापक बेंजामिन रोचा, शिक्षक विरेंद्र शेट शिरोडकर व भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

योग ही प्राचीन भारतीय जीवनशैली असून प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचे आचरण केले पाहिजे. निरोगी जीवनासाठी नियमित योग व ध्यानधारणा उपयुक्त असून प्रत्येकाने किमान अर्धातास योगाचा सराव करावा, असे मंत्री सुभाष शिरोडकर यावेळी बोलताना म्हणाले. भारतीय योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटले असून आज जगातील अनेक राष्ट्रांनी योग स्वीकारलेला आहे, असे ऍड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

Related Stories

आसगाव येथे अज्ञाताकडून साईबाबांच्या घुमटीची मोडतोड

Amit Kulkarni

मुक्तीदिनी घुमणार जय हिंद ! म्हार्दोळ पोलिस स्थानकाचा सुर

Omkar B

गगन मलिक यांची बढतीपदी पुणे विमानतळ प्रकल्पावर बदली

Amit Kulkarni

स्वार्थासाठी पक्षांतरे करणाऱया गद्दारांना अद्दल घडवा

Patil_p

डिचोलीत रविवारी सरकार तुमच्या दारी कार्यक्रम

Amit Kulkarni

‘लोकमान्य’तर्फे 16 रोजीपासून देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन

Patil_p