शिरोळ, प्रतिनिधी
Shirol Crime News : येथील एका महाविद्यालयातील तरुणाने थोर पुरुषाविषयक आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवून ते सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. निहाल शफिक शेख ( राहणार बेगर वसाहत शिरोळ) असे या तरूणाचे नाव आहे. या तरुणावर शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता.18) रोजी घडली. याबाबतची फिर्याद स्वानंद पाटील याने दिल्याने त्याच्यावर अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शिरोळ जयसिंगपूर रोडवरील केपीटी जवळ घडली.स्वानंद पाटील याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्यावर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी आज शिरोळ शहर बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे. शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला असून, शहरातून पोलीस संचलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.







