Tarun Bharat

शिरशिंगे- शिवापुर रस्ता महिनाभरात मार्गी लावणार;अनामिका चव्हाण यांचं आश्वासन

Shirshinge will pave the Shivapur road within a month; Anamika Chavan assured

सावंतवाडी कुडाळ तालुक्याला जोडणारा शिरशिंगे – शिवापुर असा रस्ता गेली पाच वर्षाहून अधिक काळ रेंगाळलेला होता . सदरचा रस्ता साडेतीन किलोमीटर वन जमिनीमध्ये अडकला असून हा रस्ता झाल्यास दोन तालुक्यांची गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत . आणि ऐतिहासिक मनोहर संतोष गडाला महत्त्वकांक्षा असणारा हा मार्ग असून मंत्रालय स्तरावर वन संज्ञा जमीन संदर्भात बैठका होऊ नये कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर दोन्ही गावच्या व पंचक्रोशीच्या नागरिकांनी येत्या 26 जानेवारीला व्यापक आंदोलन उभारण्याचे निश्चित केले होते . मात्र आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी झालेल्या दोन्ही तालुक्याच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत हा रस्ता व वन संज्ञा जमीन प्रश्न येत्या महिन्याभरात पूर्ण करून लवकरच हा ऐतिहासिक मार्गाचे काम हाती घेण्याचे आश्वासन श्रीमती चव्हाण यांनी दिले. त्यामुळे सदरचे व्यापक आंदोलन तीन मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचे शिष्टमंडाने स्पष्ट केले . दोन्ही तालुक्याच्या गावातील शिष्टमंडळात माजी सभापती मोहन सावंत ,सावंतवाडी चे माजी सभापती रवींद्र मडगावकर, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ ,शिवसेनेचे विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ ,ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पेडणेकर ,अंकुश परब आदी उपस्थित होते.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

कासार्डेत बुलेट घसरून तरुण जागीच ठार

NIKHIL_N

जि. प. चा लिपिक अखेर निलंबित

NIKHIL_N

दिलीप भालेकर यांचा व्यापारी संघातर्फे सत्कार !

Anuja Kudatarkar

पाली वळके सीमेनजीक बिबट्याचा वावर

Archana Banage

दमदार पावसाने शेतीची कामे अंतिम टप्प्यात

Patil_p

भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघात ऋतिक सावंत याची निवड

Anuja Kudatarkar