Tarun Bharat

शिरवळवाडीत मुऱ्हा म्हैशीवर कोसळली वीज; शेतकऱ्यावर अर्थिक संकट

Advertisements

अक्कलकोट प्रतिनिधी

अगोदरच अनेक संकटाशी लढताना जीव मेटाकुटीला आलेला असताना ज्या दुभत्या म्हशीच्या जोरावर संसाराचा गाडा सुरू होता, त्याच म्हशीवर वीज पडून म्हैस दगावल्याने शिरवळवाडी ता अक्कलकोट येथील मलकप्पा भीमशा घोदे या शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.

गुरुवार दि २८ रोजी दुपारी ३.४७ वाजता वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याच वेळी आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि घोदे यांच्या मोकळ्या जागेत ( गट.नं.१२१ ) झाडाखाली असलेल्या जातिवंत मुऱ्हा म्हशीवर वीज कोसळली. त्यात म्हैस जागेवर प्राण सोडली. अचानक वीज कोसळल्याने दीड लाख किंमतीची दुभती म्हैस दगावली. तलाठी राहुल जमदाडे यांनी तात्काळ पोलीस पाटील प्रदीप पाटील यांना घटनेचा पंचनामा करण्यास पाठवले. सदर घटनेचे पंचनामा अहवाल वरिष्ठांकडे पाठवले जाणार आहे. शेतकरी घोदे यांना सरकारी मदत लवकर मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Related Stories

शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी सुधारित याचिका करण्यास न्यायालयाची परवानगी; न्यायालयात सर्व कागदपत्र सादर

Archana Banage

टायरची चोरी करणाऱया पोलिसासह तिघांवर गुन्हा

Archana Banage

आयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Archana Banage

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, १० भाविकांचा मृत्यू

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

Archana Banage

भाजप आमदार टी. राजा सिंह यांना अटक

Archana Banage
error: Content is protected !!