Tarun Bharat

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक रवाना

Advertisements

Shiv Sainik leaves for Dussehra gathering

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थ व बीकेसी मैदानावर शिंदे गट व उद्धव ठाकरे या दोन गटाचा दसरा मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातून ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक मुंबईसाठी रवाना झालेत. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. यावेळी राऊळ म्हणाले, दसरा मेळावा हा एकच जो शिवाजी पार्कवर होतो. आज शेकडो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघाले आहेत. या ठिकाणी शिवाजी पार्कवर ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडकणार असून विचारांचं सोनं इथं लुटलं जाणार आहे. आमच्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक आहेत. जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. जनशताब्दी, कोकणकन्या, तुतार एक्स्प्रेस अशा तीन रेल्वेतून ३०० हून अधिक शिवसैनिक सावंतवाडी तालुक्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर शिंदे गटाचा मेळावा हा खोटनाट करून होत आहे, कार्यकर्ते देखील तसेच जमवले जात आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्या मागचा कर्ता करवीता वेगळा आहे असं मत राऊळ यांनी व्यक्त केले. यावेळी उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवदत्त घोगळे, आबा सावंत, दिनेश सावंत, संदीप गवस, संदीप माळकर, राजू शेटकर, तुकाराम कासार, उल्हास परब, विष्णू परब आदींसह शेकडो शिवसैनिक मळगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

आयएएस पूजा सिंघल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी निलंबित

Abhijeet Khandekar

जि.प. प्रशासन लागले तयारीला

NIKHIL_N

इज्जत वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने माझ्यावरची बंदी उठवली

datta jadhav

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर नारिंग्रे ग्रामपंचायततर्फे निर्जंतुकीकरण

NIKHIL_N

पवारांवरील ‘ते’ वक्तव्य भोवलं; राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

datta jadhav

राज्यपालांची भूमिका ही कायदा आणि घटनेचा भंग करणारी : संजय राऊत

Archana Banage
error: Content is protected !!