Tarun Bharat

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे / प्रतिनिधी :

पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक करीत मंगळवारी हल्लाबोल केला. यावेळी शिवसैनिकांकडून गद्दार-गद्दार अशी घोषणाबाजीही करण्यात आली. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना पुण्यातील कात्रज चौकात हा हल्ला झाला.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना तेथून उदय सामंत ताफा जात होता. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीस लक्ष्य केले. पुण्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे शहरातील दौऱ्याच्या निमिताने आमनेसामने आले होते. त्यामुळे तणावाची स्थिती होती. त्यात तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण, असा सवाल केल्याने शिवसैनिक आधीच खवळले होते. सामंत यांचा ताफा पाहिल्यानन्तर ते अधिकच संतप्त झाले. या प्रचंड गर्दीस आवरणे पोलिसांनाही कठीण जात होते. संतप्त शिवसैनिकांनी चपला, बाटल्यासह सामंत यांच्या कारवर दगडांचा मारा केला. यात सामंत यांचा सहकारी जखमी झाल्याचे समजते. यावरून शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिकांची आज मोठी गर्दी केली होती. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पुण्यात होते. सामंत हे आज दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकात असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली.

या घटनेबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी कात्रज चौकत रेड सिग्नल असल्याने थांबलो होतो. माझी गाडी कुठे जाते, कशी जाते, याची पूर्ण माहिती घेऊन हा हल्ला करण्यात आला. माझ्या गाडीवर दगड टाकण्यात आले. लाथा मारल्या. याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारची दहशत माजविण्याचे प्रकार आहे. मी या हल्ल्याला कोणाला जबाबदार धरणार नाही. शिवसैनिकांनी हा हल्ला केलेला नाही. मी माझ्या नशिबाला दोष देतो आहे. मात्र या हल्ल्यामुळे उदय सामंत थांबणारा नाही. मात्र हल्ल्याच्या वेळी संबंधित काही बोलत होते, हे मी माझ्या तक्रारीत नमूद करेन.

Related Stories

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता ‘RTPCR’ सक्ती नाही

Archana Banage

शाळा, महाविद्यालयांनी उर्वरित फी माफ करावी

prashant_c

कोल्हापुरात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला

datta jadhav

Breaking : शिवसेनेची मशाल कर्नाटक सरकारने रोखली

Kalyani Amanagi

माढा तालुक्यात कोरोना बाधितांचा उच्चांक; तब्बल ५४ बाधितांची वाढ

Archana Banage