मुख्यमंत्र्यांकडून विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे अभिनंदन
ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहूल नार्वेकर त्यांचे अभिनंदन केले. सभआगृहात बोलताना ते म्हणाले ” राहूल नार्वेकर यांची पिठीसीन पदावर निवड झाल्यावद्दल त्यांचं अभिनंदन करून, त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाबद्दल निवडीच्या अभिनंदनाचा ठराव मानतो.”
“यासभागृहाचा अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या लोकांचा देशपातळीवर गौरव झाला. आज तुमची या पदावर निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.”
“सत्ताधारी असलो तरी आम्हाला झुकते माप द्यावे अशी अपेक्षा नाही. पारदर्शी कारभार होण्यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला मिळेल ही अपेक्षा आहे. “
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार पुढे नेण्यासाठी भाजप- शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. संपुर्ण देशात या घटनेची नोंद घेतली गेली. यामुळे अनेक लोकांच्या डोळ्यात अंजन घातले गेले. यासाठी ज्या 50 आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार, तसेच पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री अमीत शहा, आणि भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सहकार्याबद्दल त्यांचही आभार.