ऑनलाईन टीम / मुंबई :
तुरूंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी राणा यांच्या रुग्णालयातील MRI आणि इतर तपासण्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (KISHORI PEDNEKAR) आणि आमदार मनीषा कायंदे (MANISHA KAYANDE) आज लीलावती रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्यांनी राणा यांच्या MRI चं ऑपरेशन करत लीलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, MRI मशीनवर गेलेली व्यक्ती मान उचलून वर काय बघते?, त्या तपासणी रूममध्ये कोणी व्यक्ती त्याचा व्हिडिओ काय काढतो, मानेच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या नवनीत राणा लीलावतीच्या बाहेर कित्येक तास माध्यमांसमोर काय बोलतात, हे कसं होऊ शकतं? अशा 20 प्रश्नांचा भडीमार त्यांनी रुग्णालय प्रशासनावर केला. या प्रश्नांचे उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाची भंबेरी उडाली.
नवनीत राणांच्या MRI दरम्यानचे फोटो बाहेर कसे आले?, रुग्ण आणि डॉक्टरशिवाय इतर कुणालाही या विभागात जाण्याची परवानगी नसते तरीही इतर लोक इथे कसे आले, इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते तरी मोबाईलमध्ये फोटो कसे क्लिक केले गेले, फोटो काढले त्या वेळी अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली, फोटो काढताना MRI मशिन बंद नव्हती कशावरून, फक्त फोटोसेशन साठीच नवनीत राणा तिथे गेल्या का?, राणा यांच्या पोटाचा एमआरआय केला तर त्यांच्या पोटाला बेल्ट का नव्हता, अशा प्रश्नांचा भडीमार करत पेडणेकर आणि कायंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं.