मालवण/प्रतिनिधी –
मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या १०वी, १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जि. प. सदस्य मा. श्री. हरी खोबरेकर यांच्या हस्ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थी समुध्दी श्रीकुष्ण गावडे, लिना विलास शिंदे, पुर्वा मनोज नांदोसकर, दिपिका सुरेश यादव, प्रथमेश माने, १२वी उत्तीर्ण विद्यार्थी तेजल प्रविण चव्हाण,जान्हवी राजन गावडे, अभिषेक विनोद गगनग्रास आदींचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मा. श्री. बाळ महाभोज, विभाग प्रमुख श्री.विजय पालव, उपविभाग प्रमुख श्री. भाऊ चव्हाण, शिवसेना महिला विभाग संघटक सौ. प्रज्ञा चव्हाण, काकू गावडे, माजी सरपंच श्री. अशोक नांदोसकर, सरपंच सौ. नांदोसकर, पार्टे मॅडम, शाखा प्रमुख श्री. राजू गावडे, ग्रा. पं. सदस्य हंजनकर, पालकवर्ग, विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पूढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.