Tarun Bharat

शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Advertisements

ऑनलाईन टिम मुंबई

सक्तवसुली संचालनालयाने आज रविवारी मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून काही तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना मुंबईतील सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात नेण्यात आले. खासदार संजय राऊत हे त्यांच्या घरातून स्वत:च्या गाडीमधून कार्यालयाकडे निघाले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

संजय राऊत यांना मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासातील संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. या व्यवहारातील अनियमनतेत त्यांची पत्नी आणि काही सहकाऱ्यांवर देखिल आरोप ठेवण्यात आले आहेत. राऊतांच्या घरातील चौकशीपुर्वी ईडीने त्यांच्याविरुद्ध दोन समन्स जारी केले होते. त्यापैकी अलिकडेच 27 जुलै रोजी एक समन्स बजावले होते.

Related Stories

अभिनेत्री तब्बुचा अपघात; ‘भोला’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना दुखापत

Kalyani Amanagi

महाराष्ट्र केसरीच्या गदेचे पुण्यात पूजन

datta jadhav

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज !

Rohan_P

कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी आता मंत्रालयातील कर्मचारी

Omkar B

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Rohan_P

‘जरंडेश्वर’चा नेमका मालक कोण ?

Patil_p
error: Content is protected !!