ऑनलाईन टीम/तरुण भारत
खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी न्यायालयाने राखून ठेवली आहे. आता ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी ९ नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरण खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत हे दोघेही न्यायलयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी ९ नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. कोर्टाने जामिनावरील निकाल राखून ठेवला आहे.
दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत न्यायलयीन कोठडीत आहेत. उद्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्याआधी खासदार संजय राऊत यांचा जामीन मंजूर होतो का, याकडे ठाकरे गटाचे लक्ष लागले होते. पण राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी राखून ठेवल्याने पुन्हा एकदा निराशा झाली.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खासदार संजय राऊत यांना ईडीने ३० जून २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हा त्यांना ईडी कोठडी ठेवण्यात आले होते. तर, ८ ऑगस्ट रोजी पीएमएलए कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे खासदार राऊत यांना आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. तर, ७ सप्टेंबरला त्यांनी पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.