कन्नड रक्षक वेदिकेने (Kannad Rakshak vedike) महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली. कन्नड रक्षण वेदिकेने केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आज ठाकरे गटाने राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करत समन्वयक मंत्र्यांना बांगड्यांचा आहेर दिला. कर्नाटक मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. यावेळी कोगनोळी टोल नाका (Kognoli Toll ) दिशेने चाललेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेला कोल्हापूर पोलिसांनी अडवल्याने मोठा तणाव निर्माण झाला. त्यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
महाराष्ट्रातील सीमा भागातील समन्वयक मंत्र्यांनी बेळगाव (Belgoam ) दौरा रद्द केल्यानंतर ही कर्नाटकातील कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्याचा निषेध म्हणून ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील प्रतिउत्तर दाखल सीमा भागाकडे कुच केली. ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करत कोगनोळी टोल नाक्याकडे रवाना झाले. मात्र दूधगंगा नदीच्या पुलावर कोल्हापूर पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचा ताफा अडवला. यावेळी मोठी झटापट झाली. महाराष्ट्रातील समन्वयक मंत्र्यांनी दौरा रद्द केल्याने ठाकरे गटाने त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनावर दगडफेक केल्याचा निषेध करत कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बेळगाव दौरा रद्द केल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी मंत्री चंद्रकांत पाटील () आणि शंभूराज देसाई यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना बांगड्यांचा आहेर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दबावशाही असून गनिमी काव्याने आम्ही लवकरच बेळगावात घुसू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला

