Tarun Bharat

कोल्हापुरात शिवसेना- वंचित युतीचे पालकमंत्री चलेजाव आंदोलन..

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात दलित वस्ती निधीला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना- ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळावर पालकमंत्री चले जाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यात शिवसेना- ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात पालकमंत्री चलेजाव आंदोलन करून युतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. काही दिवसापुर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्ह्यातील दलित वस्तीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक वस्त्यांमधील कामे खोळंबली असून काही कामे अर्धवट पडली असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.

या आंदोलना दरम्यान दलित वस्ती निधीची स्थगिती उठवण्याची जोरदार मागणी करण्यात येउन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निधीवरिल स्थिगीती लवकर उठवावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळावर झालेल्या या आंदोलनावेळी शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील टेंबे स्वामींच्या मठात चोरीचा प्रयत्न

Archana Banage

खासदार संजय मंडलिक यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

Archana Banage

महापुराच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार शितल मुळे – भामरे यांनी आरे येथे आढावा बैठक घेतली

Archana Banage

पशुवैद्यकीय दवाखान्याला वाली कोण?

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही : जिल्हाधिकारी

Archana Banage

Kolhapur : डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी निरिक्षण मोहिम

Abhijeet Khandekar