Tarun Bharat

राज्यसभेतून शिवसेनेची माघार?

Advertisements

मुंबई: भाजपने (BJP)महाविकास आघाडीची ऑफर धुडकावल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे सहावे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) हे आज अर्ज माघार घेण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात शिवसेना (Shivsena) विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे चित्र दुपारी तीन नंतर स्पष्ट होणार आहे.

राज्यसभेचा अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राज्यात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीत भाजपने विधान परिषदेच्या जागा घ्याव्यात आणि राज्यसभेची उमेदवारी बिनविरोध करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. मात्र भाजपने ही ऑफर धुडकावून लावत राज्यसभेची सहावी जागा लढवणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसची जागा वाचवण्यासाठी आता शिवसेना सहावा उमेदवार राज्यसभेतून माघार घेण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्या बदल्यात विधान परिषदेच्या तीन जागा शिवसेना लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे राज्यसभेचे सहावे उमेदवार शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते संजय पवार हे आज माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे दुपारी तीन नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

सज्जनगडावर बिबटय़ाच्या बछडय़ाचे दर्शन

Patil_p

आई अंबाबाई, मुश्रीफ साहेबांना लवकर बरं कर..!(व्हिडिओ)

Abhijeet Shinde

भाजपचे नेते एकनाथ खडसेंनाही महावितरणाचा ‘शॉक’

Rohan_P

प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्ड कार्यालय आवश्यकच

Abhijeet Shinde

कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट ; पाचजणांना अटक

Abhijeet Shinde

चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; बंडखोर आमदार शिरसाटांची जहरी टीका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!