ऑनलाईन टीम/तरुण भरत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आधी सुरतमध्ये आणि नंतर थेट गुवाहाटीमध्ये दाखल झाल्याने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधणेही अवघड झालेय. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत परत येण्याचे भावनिक आवाहन केले. मात्र आवाहनाच्या उलटचं मोठ्या संख्येने शिवसेना बंडखोर आमदार शिंदेंच्या गटात सहभागी होत आहेत. यातच काही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीमध्ये (Guwahati) दाखल झाले होते त्यांना आसाम (assam) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
साताऱ्यातील काही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले होते. यावेळी या शिवसैनिकांपैकी संजय भोसले यांनी रेडिसन हॉटेलबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आसामा पोलिसांनी संबंधित शिवसैनिकाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत. या हॉटेलजवळ शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले पोहोचले होते. त्यावेळी त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करत होते.
हेही वाचा : घाईघाईनं जीआर जारी होत आहेत, हस्तक्षेप करा; प्रवीण दरेकरांचे राज्यपालांना पत्र