राज्यात सेनेतील अंर्तगत बंडाळीला आता वेगळेच रुप पाहायला मिळत आहे. आज जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोरांना आव्हान तर भाजपावर टीकास्त्र डागले आहे. शिंदेंच्या गोटात हळूहळू आमदार सहभागी होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सेना आता सर्तक झाली आहे. तर शिंदेशी काहींचा संपर्क असल्याचे समोर येताच बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यासाठीच आज जिल्हाप्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा. बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रतीक्रिया दिली आहे. हे सारं भाजपने केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावीचं लागेल असेही ते म्हणाले आहेत. तर तुम्हाला जर भविष्य दिसत असेल तर खुशाल जा असे स्पष्टीकरणंही त्यांनी केलं आहे. आज झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी चर्चा केलीयं. या चर्चेतील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया.
जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय म्हणाले मुख्यमंत्री
१)एकनाथ शिंदेसाठी काय कमी केलं?त्यांना नगरविकास खातं दिलं.
२)संजय राठोडांवर वाईट आरोप होऊनहा मी सांभाळल.
३)माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे.
४)झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण मुळ मात्र नेऊ शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
५)ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा असे आव्हानही त्यांनी केलं आहे.
६)आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन?असा सवाल त्यांनी केला आहे.
७)बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं?
९)बाहेरच्या भाडोत्री लाकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे.माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा.
१०) मी वर्षा बंगला सोडला आहे संघर्ष नाही.
जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय म्हणाले मुख्यमंत्री; जाणून घ्या महत्त्वाचे १० मुद्दे
Advertisements