Tarun Bharat

राजेश क्षीरसागरांच्या बंडाने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात देखील शिवसैनिक एकत्र जमले असून, वचनबध्द पदयात्रा काढण्यात आली आहे. ही पदयात्रा दसरा चौकातून सुरु झाली आहे. यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान राजेश क्षिरसागर (Rajesh Kshirsagar)यांच्या घरावर हा मोर्चा नेण्यात आला आहे. राज्यातील जे जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

कोल्हापुरात निघालेल्या या पदयात्रेत खासदार संजय मंडलिक, सर्व जिल्हा प्रमुख सहभागी झाले असून शेकडो शिवसैनिक दसरा चौकातून निघाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याविषयीचा रोष शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे असंख्य शिवसैनिक उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या बाजूने आहेत असा संदेश दिला जात आहे. या यात्रेत ग्रामीण भागातील अबाल वृध्द, महिलांचा समावेश आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा- कोल्हापुरात शिवसैनिक एकवटले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली


प्रकाश आबिटकर हे देखील शिंदे यांच्या गोटात आहेत. दरम्यान आता राजेश क्षीरसागर हे देखील गुवाहाटीत पोहचले आहेत. भरत गोगावले, राजेश क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच छायाचित्र सध्या व्हायरल झाले आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक विधानसभेच्या दोन जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक

Abhijeet Shinde

कोव्हिड रुग्णालयांवर आता सीसीटीव्ही आधारे नियंत्रण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सिरसंगी येथील ४० एकर ऊस शॉर्ट सर्किटने जळाला

Abhijeet Shinde

शेतकऱ्याचा खून, दोघा भावांना आजन्म कारावास

Abhijeet Shinde

मुंबईत चार तासांच्या वर पाणी साचू देणार नाही – किशोरी पे़डणेकर

Abhijeet Shinde

चीनला आणखी एक धक्का; हिरो सायकलने रद्द केला 900 कोटींचा करार

datta jadhav
error: Content is protected !!