अवचारहट्टी येथे नवक्रांती युवक मंडळाच्यावतीने कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
मावळय़ांना लढण्याचे बळ मिळावे यासाठी शिवकाळात शाहिरांनी शूरतेचे कौतुक करणारे पोवाडे सादर केले. सध्याच्या काळात युवा पिढीला शिवकालीन पोवाडय़ांसोबत समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे, हे हिंडलगा येथील शाहीर वेंकटेश देवगेकर यांनी आपल्या पोवाडय़ांमधून दाखवून दिले. अवचारहट्टी (येळ्ळूर) येथील नवक्रांती युवक मंडळाच्यावतीने कलमेश्वर व चांगळेश्वरी यात्रेनिमित्त शिवकालीन पोवाडय़ाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाहीर देवगेकर यांनी शिवजन्म काळापासून शिव राज्याभिषेकापर्यंतचा काळ आपल्या पहाडी आवाजाने पोवाडय़ातून जागविला. पोवाडय़ासोबतच स्त्री भ्रूण हत्या, लग्नाविषयीचा बदललेला दृष्टिकोन यासह विविध विषयांवर समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तितक्मयाच ताकदीची संगीत साथ व कोरसची साथ मिळाली.
कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य कल्लाप्पा मेलगे, उमेश डुकरे, भय्या होसुरकर, धाकलू करवीनकोप्प, विठ्ठल मोनाप्पा कुरंगी, मनोहर सांबरेकर, गजानन सुळेभावी, लक्ष्मण मेलगे, यल्लाप्पा पाटील, राजू मेलगे, विठ्ठल करवीनकोप्प, सोमनाथ कुरंगी, गंगाराम तुळजाई, शंकर सुळेभावी, शंकर पाटील, सोमनाथ मेलगे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.