शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विभागवतीने आयोजन
वार्ताहर / किणये
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान किणये विभागाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. गावात गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती उभारण्यात आली आहे.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र म्हणण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी
दिल्या. सूरज खन्नूकर, किणये शाखा प्रमुख निवृत्ती डुकरे, ग्रा. पं. सदस्य श्रीधर गुरव, अनिल पाटील, शिवाजी उंदरे आदी उपस्थित होते. आभार पुंडलिक दळवी यांनी मानले.