Tarun Bharat

शिवाजी पार्कातील 15 झोपड्या जळून खाक, 10 लाखांचे नुकसान

प्रतिनिधी,कोल्हापूर
Burning Hut In Shivaji Park Kolhapur : शिवाजी पार्क येथील इंदिरा नगर झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी भिषण आग लागली. यामध्ये 15 झोपड्यांचा अक्षरश: कोसळा झाला असून यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.प्रापंचीक साहित्यासह,स्क्रॅप, विक्रीचे साहित्य असे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान अग्नीशमन दलाच्या तत्परतेमुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. अग्नीशमन दलाच्या सतर्कतेमुळे आगीचा फैलाव झाला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी पार्क येथील इंदिरा नगर परिसरात सोनझार गल्ली आहे. या ठिकाणी स्क्रॅप गोळा करणारे, तसेच अंगठ्या, व इतर वस्तू विक्री करणारे नागरीक राहतात. मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास संजय सोनझारी यांच्या घरातून धूर येत असल्याचे परिसरातील नागरीकांच्या निदर्शनास आले.त्यांनी तात्काळ याची माहिती अग्नीशमन दलास दिली.तसेच परिसरातील तरुणांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.मात्र बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले व बाजूच्या झोपड्यांनाही याची झळ पोहोचली. यामुळे आग इतरत्र पसरू लागली.यावेळी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेवून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

स्थानिक तरुणांचे यश
सुमारे 30 ते 40 तरुणांनी दोन गट तयार केले.एका गटाने आग पसरू नये यासाठी पुढील झोपड्यांमधील साहित्य घराबाहेर काढण्यास सुरुवात केली.त्यांनी घरातील सिलेंडर बाजूला काढून आग भडकू नये याची दक्षता घेतली.तर दुसऱ्या बाजूने तरुणांच्या दुसऱ्या गटाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी मारण्यास सुरुवात केली.याचवेळी जवळपास 4 सिलेंडर हवेमध्ये उडाली.तर 10 ते 15 सिलेंडर रिकाम्या जागेत आणून ठेवली.या सतर्कतेमुळे आग इतरत्र पसरण्यापासून थांबली.

प्रशासक घटनास्थळी दाखल
घटनास्थळी महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे,अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई,उपायुक्त रविकांत आडसूळ,पोलीस निरीक्षक राजेश गवळी,माजी नगरसेवक राजेश लाटकर,अनिता ढवळे,कृष्णराज महाडिक यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.तसेच नागरीकांची विचारपूस केली.

सहा अग्नीशमन बंब घटनास्थळी
आगीची भीषणता आणि इंदिरा नगर सोनझार गल्ली येथील दाटीवाटी लक्षात घेवून अग्नीशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी बोलविण्यात आले होते. टिंबर मार्केट, फुलेवाडी, लक्ष्मीपुरी, महापालिका, शास्त्रीनगर, कावळा नाका येथील 6 अग्नीशमन दलाचे बंब तसेच 30 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.मुख्य अग्नीशमन अधिकारी तानाजी कवाळे,मनिष रणभिसे,ओंकार खेडकर,कांता बांदेकर यांच्यासह 30 कर्मचारी होते.

जोशी नगरचा प्रश्न गंभीर
संभाजीनगर येथील सुधाकर जोशी नगरचा प्रश्न गंभीर बनला आहे.या ठिकाणी 300 ते 400 झोपड्या असून अत्यंत दाटीवाटीने वस्ती आहे.शेजारीच पेट्रोल पंप आहे.या ठिकाणीही अशा प्रकारे दुर्घटना घडल्यास मोठी हानी होवू शकते.या परिसरात दाटीवाटीने झोपड्या आहेत. यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.या ठिकाणी आतपर्यंत जाण्यास रस्ताही नसल्याने गंभीर दुर्घटना घडू शकते.

महिलांचा आक्रोश,डोळ्यादेखत संसाराची राख रांगोळी
शिवाजी पार्क येथील इंदिरा नगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये 1970 पासून लोक राहत आहेत. ओपन स्पेस असणाऱ्या या जागेवर नागरीकांचे वास्तव्य गेल्या 50 वर्षापासून अधिक काळ आहे.शहरातील कष्टकरी वर्ग येथे राहतो.स्क्रॅप गोळा करणे त्याची विक्री करणे तसेच कंगवे,अंगठ्या, फनी असे साहित्य विक्री करणारा समाज या ठिकाणी राहतो.अगदी 10 बाय 10 च्या साध्या झोपड्यांमध्ये हा समाज राहतो.हातावरचे पोट असणाऱया या कष्टकरी समाजाच्या संपूर्ण संसार मंगळवारच्या आगीमध्ये बेचीराख झाला.डोळ्यादेखत झालेली ही राख पाहून महिलांनी व नागरीकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.

दोन वर्षाच्या चिमुरडीस जिवदान
विद्या सोनझारी ही दोन वर्षाची मुलगी झोपडीमध्ये एकटीच झोपली होती.तिचे आई वडील कामासाठी बाहेर गेले होते.आग लागल्यानंतरही काही काळ विद्या झोपडीत तशीच होती. शेजाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती तरुणांना दिली.तरुणांनी तात्काळ त्या मुलीस झोपडीतून बाहेर काढले.

Related Stories

सोलापुरात काल 18 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 5 जणांचा बळी

Archana Banage

जगभरातील कोरोनामुक्ती 8 कोटींवर

datta jadhav

जिल्हय़ातील सर्व शाळा सुरू करा

Archana Banage

राष्ट्रीयकृत बँकांनी बेकायदेशीर मनमानी वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन

Archana Banage

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत

Archana Banage

राजर्षी शाहू महाराज, दीक्षित गुरूजी, तोफखाने मास्तर!

Archana Banage