Burning Hut In Shivaji Park Kolhapur : आशिष आडिवरेकर,कोल्हापूर
शिवाजी पार्कच्या उच्चभ्रू वस्तीलगच्या झोपडपट्टीला मंगळवारी दुपारी आग लागली.बघता बघता 22 झोपडपट्टय़ा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.गेली 50 वर्षे या ठिकाणी जगण्याचा संघर्ष करणाऱ्या 15 कष्टकरी कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले.प्रापंचिक साहित्यासह महत्वाची कागदपत्रे,व्यवसायाचे साहित्य भस्मसात झाले.सुदैवाने जीवतहानी झाली नाही,पण आगीने संसाराला आणि मनाला दिलेले चटके वेदना देणारे ठरले.डोळ्यासमोर जळलेल्या झोपडीची राख पाहत डोळे भरून आलेल्या येथील कष्टकरी अबालवृद्धांना आता उद्याची चिंता लागली आहे.घटनास्थळावरील दृष्याने त्यांचा उद्यापासून सुरू होणारा नवा संघर्षही अधोरेखित झाला.त्यांच्या संघर्षाला सामाजिक भावनेतून मदतीचे हात पुढे येण्याची गरज निर्माण झाली.कष्टकऱ्यां च्या जगण्याला मदतीच्या हातांची गरज आहे. या संपूर्ण परिस्थिचीचे चित्रण कॅमेऱ्यात कैद केले आहे. आमचे तरुण भारतचे छाय़ाचित्रकार रियाज ट्रेनर यांनी.








इंदिरानगर परिसरात एकूण 186 कुटूंब असुन त्यामध्ये 500 हून अधिक नागरीक राहतात. यामध्ये 22 कुटूंबातील 93 नागरीक आज रस्त्यावर आले आहेत. या नागरीकांसमोर आज नव्याने कसे उभे रहायचा असा प्रश्न या नागरीकांसमोर उभा राहिला आहे. या आगीमध्ये नागरीकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची खात्याची बुक तसेच रोख रक्कम यासोबतच व्यवसायासाठी लागणारा कच्चा मालही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. यामुळे सगळेच जळाले आता नव्याने कसे उभे


शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीमध्ये 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली.दाटीवाटीने असलेल्या वस्तीमध्ये आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते.हीच घटना सकाळी लवकर घडली असती तर यामध्ये जिवीत हानी झाली असती.या झोपडपट्टीतील मुले 11 वाजण्याच्या सुमारास शाळेसगेली असल्याने थोडी गर्दी कमी होती.जर हीच घटना रात्रीच्या वेळी घडली असती तर काय झाले असते ? याचा अंदाजही करता आला नसता.


कष्टकरी वर्गाचा संपूर्ण संसारच बेचिराख झाला. संपूर्णच जळून खाक झाल्याने आता उद्याचे काय असा प्रश्न येथील नागरीकांच्या चेहऱयावर दिसत होता. तर वृद्ध दांम्पत्य आता काय करायचे असा सवाल डबलेल्या डोळ्यातून एकमेकांना विचारत होते.


घटनास्थळी महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे,अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई,उपायुक्त रविकांत आडसूळ,पोलीस निरीक्षक राजेश गवळी,माजी नगरसेवक राजेश लाटकर,अनिता ढवळे,कृष्णराज महाडिक यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.तसेच नागरीकांची विचारपूस केली.