Tarun Bharat

झालेल्या पेपरविषयी चुकीचे परिपत्रक व्हायरल

शिवाजी विद्यापीठ अज्ञातावर गुन्हा नोंद करून, सायबर सेलमार्फत करणार चौकशी : ‘फिजिकल केमेस्ट्री-2’पेपरचा प्रकार : विद्यार्थी व पालकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांचे आवाहन

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत एमएस्सी भाग एक सत्र दोनचा फिजिकल केमेस्ट्री -2 पेपर 23 ऑगस्ट रोजी सुरळीत पार पडला आहे. परंतू विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जुन्या परिपत्रकात छेडछाड करून हा पेपर 26 ऑगस्टला होणार असे परिपत्रक अज्ञाताने व्हायरल केले आहे. हे परिपत्रक काही महाविद्यालयांपर्यंत पोहाचल्यानंतर विद्यापीठ परीक्षा विभागाकडे चौकशी केली असता हे परिपत्रक फेक असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची तक्रार सायबर सेलकडे देवून चौकशी अंती संबंधीतावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

एमएस्सी फिजिकल केमेस्ट्री-2 पेपर 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत झाला आहे. तरीही हा पेपर 26 ऑगस्ट रोजी होणार असे परिपत्रक अज्ञात व्यक्तीने चुकीच्या पध्दतीने व्हायरल केले आहे. या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाणार आहे. तसेच सायबर सेलमार्फत चौकशी करून संबंधीतावर कडक कारवाई केली जाईल. तरी महाविद्यालये, विद्यार्थी, पालक यांनी गोंधळून न जाता या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन परीक्षा संचालक डॉ. जाधव यांनी परिपत्रकाव्दारे केले आहे.

इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस पेपर सोमवारी
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विधी अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स’ (आयपीआर) या विषयाचा 26 रोजी होणारा पेपर अपरिहार्य कारणाने रद्द केला होता. रद्द केलेला पेपर सोमवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार आहे. यासंदर्भातील माहिती महाविद्यालये व विद्यार्थ्यांना परिपत्रकाव्दारे कळवली होती. तरीही ही पुर्नपरीक्षा होवू नये, या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला दिले आहे. तरीही हा पेपर 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार आहे. या परीक्षेला न बसणाऱया विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही, याची महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी.

Related Stories

आता बूस्टर डोसवर सरकारचे लक्ष

datta jadhav

फ्लॅटच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक; आरोपी अटकेत

datta jadhav

शेअर्स परस्पर वर्ग करुन 70 लाखाची फसवणूक

Patil_p

साताऱयाचे एन्ट्री पॉईंट विकसीत करणार

Patil_p

राज्य कबड्डी स्पर्धांचा वाजला बिगूल

Abhijeet Shinde

दस्त नोंदणीचे कामकाज शनिवार व रविवारी सुरू राहणार-मुद्रांक जिल्हाधिकारी

Sumit Tambekar
error: Content is protected !!