Tarun Bharat

Shivaji University Election 2022 : राजकीय डाव अन् निवडणूक बिनविरोध

  • विद्यापीठ विकास आघाडी विरोधी उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी
    -विभिन्न विचाराच्या संघटना विद्यापीठात पुन्हा एकदा एकत्र

अहिल्या परकाळे,कोल्हापूर
राज्याच्या राजकारणात परस्पर विरोधी पक्ष, संघटना विद्यापीठाच्या निवडणुकीत पक्षीय अभिन्वेष बाजूला ठेवत पुन्हा एकदा मांडीला मांडी लावून एकत्र लढत निवडणुकीत यश संपादन केले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, भाजप एका बाजूला तर त्यांच्या विरोधात सुटा, ठाकरे शिवसेना आणि भाकपच्या विचाराचे लोक एकत्र आले आहेत. विभिन्न विचार सरणीचे लोक एकत्र येत विद्यापीठ निवडणुकीत वेगळे मॉडेल राबवत आघाडी यशस्वी झाली आहे. यापूर्वीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकत्र येत अमोल काळे यांना निवडून दिले. त्याचीच पुनरावृत्ती विद्यापीठ निवडणुकीत झाली असून विकास आघाडीने तब्बल 54 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. परिणामी विद्यापीठावर यंदाही विकास आघाडीचेच वर्चस्व राहणार असेच सध्या चित्र आहे.

शिवाजी विद्यापीठ निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून ते माघारीपर्यंत निवडणूक होण्यापूर्वीच बहुतांश जागा बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूकीपूर्वीच जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी विभिन्न विचाराच्या संघटनांनी एकत्र येत विद्यापीठ विकास आघाडी अंतर्गत केलेले राजकीय डावपेच फायदेशीर ठरले. त्यामुळे सुटाच्या उमेदवारांनी आपल्याला निवडणूक लढवायची नसून आमचा विकास आघाडीला पाठिंबा असल्याचे लिहून देत 18 अभ्यास मंडळ बिनविरोध केलीच पण 54 जागा आघाडीला बिनविरोध देत निवडणूकीतून काढता पाय घेतला. आपल्या पक्षाचा विचार बाजूला ठेवत विद्यापीठ निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेसला भाजपची अभाविप आणि शिंदे सेनेच्या गट एकत्र आले आहेत. त्यामुळे शिक्षक मतदार संघ सोडला तर अन्य ठिकाणी आघाडीच्या विरोधात प्रबळ विरोधकच राहिलेला नाही.

विद्यापीठातील विविध अधिकार मंडळासाठी निवडणूक लागली असून, 14 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान आहे. तत्पूर्वीच येणाऱ्या नवीन शिक्षण धोरणाचे धोके ओळखत सुटा आणि विकास आघाडीच्या उमेदवारांनी एकमेकांना विरोध न करता अभ्यास मंडळ वाटून घेतली.दर्जेदार शिक्षणाच्या दृष्टीने ही गोष्ट स्वागतार्ह आहे, परंतू येथे आघडीच्या नेत्यांनी खेळलेल्या राजकीय खेळीत सुटा आणि आजी-माजी कृती समितीचे सर्वच उमेदवार अडकले.परिणामी आपल्या नेत्यांना न विचारताच उमेदवारांनीच परस्पर जागा वाटप करून सेटेलमेंट केली.असे असले तरी अधिसभा शिक्षक मतदार संघात आघाडीच्या विरोधात ‘सुटा’ तर अधिसभा पदवीधर मतदार संघात ‘शिव-शाहू आघाडी’चे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

शिक्षक मतदार संघात सुटाकडून जोरदार प्रचार सुरू असून आपणच बाजी मारणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय.पदवीधरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला पाच आणि अभावीपला पाच जागा दिल्याने सर्वच जागांवर आघाडी आपले वर्चस्व कायम ठेवेल. दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अभाविपचे अमित कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने शिवाजी विद्यापीठ आजी-माजी कृती समितीच्या एका उमेदवाराला नामनिर्देशित जागा देण्याचे अश्वासन देऊन त्यांचे मतदान आपल्याकडे वळवण्यात आघाडी यशस्वी झाली आहे. एकूणच विकास आघाडीने निवडणूक होण्यापूर्वीच सर्व विरोधकांना चितपट केले अन् विजय मिळवला, ऐवढेच काय पण बिनविरोध झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभही पार पडला.

विद्यापीठ निवडणुकीत गेल्या पाच वर्षापूर्वी तिरंगी लढत झाली होती. विकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात सुटाने ताकदीचे उमेदवार उभे करून उमेदवारांना निवडूनदेखील आणले. परिणामी अभ्यास मंडळावर सुटाचेच वर्चस्व होते. यंदा मात्र सुटाचा अंतर्गत वाद आणि समविचारी पक्षाच्या संघटना एकत्र आल्यामुळे चित्र उलटे दिसतेय. पदवीधर मतदार संघात शिव-शाहू आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी त्यांची ताकद लागणार नाही, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.

पदवीधरच्या 36343 नोंदींपैकी 26 हजार विकास आघाडीच्या
विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर निवडणुकीत पदवीधर मतदार नोंदणीला अतिशय महत्व आहे. विद्यापीठाच्या इतिहासात यंदा तब्बल 36 हजार 343 पदवीधर मतदारांची नावनोंदणी झाली आहे. त्यापैकी 26 हजारपेक्षा जास्त नावनोंदणी आघाडीने केलीय. उर्वरीत 10 हजार मतदारांची नावनोंदणी इतर संघटनांनी केली आहे. त्यामुळे सर्व संघटनांमध्ये 10 हजार मतांची विभागणी झाल्यास, विकास आघाडीचे मतदान एकगट्टा राहणार हे स्पष्ट आहे.

हेही वाचा- बाहेरच्या येऊन कोल्हापूरला हिंदूत्व शिकवू नये, रविकिरण इंगवले

प्राचार्य, संस्थाचालक विकास आघाडीचेच
विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संस्थापक, प्राचार्यांनीच एकत्र येत विद्यापीठ विकास आघाडीची स्थापना केली आहे. मुळातच सुटा संघटना प्राचार्य आणि संस्थाचालकांकडून शिक्षकांवर अन्याय होवू नये म्हणूनच उदयास आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे या दोन्ही मतदार संघात उमेदवारच नसल्याने दोन्ही मतदार संघ बिनविरोध निवडले असून, विद्यापीठावर आघाडीचेच वर्चस्व कायम आहे.

Related Stories

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने डॉ. रुपा शहा यांचा गौरव

Archana Banage

राधानगरीचा ४ था दरवाजा बंद, अजूनही दोन दरवाजे उघडे

Abhijeet Khandekar

महिलेचा ‘महिला पोलिस’ला चोप

Archana Banage

रवि इंगवलेंसह पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा

Archana Banage

एनआयएचा कोल्हापुरात छापा, तरुण ताब्यात

Kalyani Amanagi

खासगी मूल्यमापनामुळे शिक्षकांमध्ये खळबळ

Archana Banage
error: Content is protected !!