Tarun Bharat

Kolhapur; शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने विद्यापीठाचा निर्णय

कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र भर पावसाचा जेर वाढत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर सह कोकण भागात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.

 पश्चिम महाराष्ट्रात गेले काही दिवस पाऊसाची जोरदार बॅटिंग चालु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर सुद्धा झाला आहे. विद्यापिठात सध्या ऑगस्ट २०२२च्या परिक्षा सुरू आहेत. शिवाजी विद्यापीठाचे परिक्षेत्र असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर असल्याने काही भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले आहे. परिक्षेसाठी येणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने दि १० आणि ११ या दिवशीच्या परिक्षेचं वेळापत्रक स्थगित केले आहे. या दिवशी होणाऱ्या परिक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे. विद्यापीठीने ही माहीती आपल्या ट्वीटर हँडलवरून कळवली आहे.

Related Stories

सातारा : कैलास स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वाटप

Archana Banage

तुळशी विवाह प्रारंभ झाल्याने बाजारात पेठेत खरेदीला गर्दी

Patil_p

उस्मानाबाद : 40 हजाराची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी जाळ्यात

Archana Banage

गोकुळ निवडणूक : ‘आता जागतिक कोर्टात जाऊ नये’

Archana Banage

सातारा शहरात सापडला आणखी एक कोरोनाबाधित

Archana Banage

दीडशे दिवस हंगाम, इथेनॉल निर्मितीवर भर

Archana Banage