उमेदवारी अर्ज मागार घेण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत मुदत
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरले असून 31 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. अधिसभेच्या 39 जागांसाठी 290 उमेदवारांनी अर्ज आले आहेत. यंदा विद्यापीठ विकास आघाडी, सुटा, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी परिषद, शिव-शाहू विचार पंच, अपक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे विद्यापीठाची अधिसभेची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबर अर्ज मागारीची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
शिवाजी विद्यापीठ निवडणूकीचा दुसरा टप्पा म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली आहे. 2 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे तक्रार करावी. 3 नोव्हेंबर रोजी अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द होईल. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून निकाल जाहीर होईल. अधिसभा निवडणुकीसाठी संस्थाप्रतिनिधी खुल्या प्रवर्गाच्या जागांसाठी 22 अर्ज, महिला प्रतिनिधी 3 अर्ज अनुसुचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी एकही अर्ज नाही. प्राचार्य खुला प्रवर्गा 5 जागांसाठी 9 अज्घ्&, महिला प्रतिनिधी एका जागेसाठी एक अर्ज, अनुसूचित जाती प्रतिनिधी एका जागेसाठी तीन अर्ज, अनुसूचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी शून्य अर्ज, भटक्या व विमुक्त जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी एक अर्ज, इतर मागासवर्ग प्रतिनिधी एका जागेसाठी तीन अर्ज असे दहा जागांसाठी 17 अर्ज प्राप्त झाले आहेत.
महाविद्यालयीन शिक्षक प्रतिनिधींच्या खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांसाठी 27 अर्ज, महिला प्रतिनिधी एका जागेसाठी 3 अर्ज, अनुसूचित जाती एका जागेसाठी 15 अर्ज, अनुसूचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी 3 अर्ज, भटक्या व विमुक्त जमाती एका जागेसाठी 8 अर्ज, इतर मागासवर्ग एका जागेसाठी तीन अर्ज असे दहा जागांसाठी 59 अर्ज आले आहेत. नोंदणीकृत पदवीधर खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांसाठी 91 अर्ज, महिला एका जागेसाठी 18 अर्ज, अनुसूचित जाती एका जागेसाठी 15 अर्ज, अनुसूचित जमाती एका जागेसाठी 5 अर्ज, भटक्या व विमुक्त जमाती एका जागेसाठी 19 अर्ज, इतर मागासवर्ग एका जागेसाठी 16 अर्ज, एकूण दहा जागांसाठी 164 अर्ज आले आहेत. विद्यापीठ शिक्षक प्रतिनिधींच्या खुल्या प्रवर्गाच्या एका जागेसाठी 11 अर्ज, महिला एका जागेसाठी 8 अर्ज, अनुसूचित जमाती एका जागेसाठी 6 अर्ज, असे एकूण तीन जागांसाठी 25 अर्ज आले आहेत.
विद्यापरिषद शिक्षक प्रतिनिधी निवडणुकीसाठी 8 प्रतिनिधींसाठी 27 अर्ज प्राप्त झाले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या खुल्या जागेसाठी 5, तर अनुसूचित जमाती जागेसाठी 2 अर्ज आले आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या खुल्या महिला जागेसाठी 2 तर भटक्या व विमुक्त जमाती जागेसाठी शून्य अर्ज आले आहेत. मानव्यविद्या विद्याशाखेच्या खुल्या जागेसाठी 4 तर अनुसूचित जाती जागेसाठी 4 अर्ज आले आहेत. आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या खुल्या जागेसाठी 9 तर इतर मागासवर्ग जागेसाठी 1 अर्ज आले आहेत. 36 अभ्यासमंडळांवर प्रत्येकी 3 जागांसाठी 184 अर्ज आले आहेत, अशी माहिती प्रभारी कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिली.