शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील डॉ. के. एम. गरडकर यांचे संशोधन
अहिल्या परकाळे कोल्हापूर
विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळेत मेटल चॉल्कोजेनाईडचा वापर करून अधिकतम क्षमतेचा सौर घट तयार केला आहे. फक्त शंभर रूपयांच्या खर्चात तयार केलेले हे सौर घट पाण्यातील रंगद्रव्याचे विघटन करतात. एवढेच नाही तर पाण्यातील बॅक्टेरियाही मारतात. प्रयोगशाळेत सुरू असलेल्या या समाजोपयोगी संशोधनाला राज्य सरकार किंवा खासगी संस्थांकडून आर्थिक बळ मिळाले तर हे संशोधन सार्वजनिक करण्याचा संशोधक डॉ. के. एम. गरडकर यांचा मानस आहे.
रंगद्रवरूप इलेक्ट्रोलाइट लागतो ज्यामुळे धातूवरती गंज निर्माण होऊन त्यांचा ऱहास होतो. ही रंगद्रव्य अतिशय महागडे असल्याने हा सोलार घट सामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे डॉ. गरडकर व त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने द्रवरूप रंगाऐवजी मॉलिब्ल्डनम सल्फाईड या स्थायू सेमीकंडक्टरचा वापर करून सेन्सिटायझेशन (रूपांतरीत) केले. सौर घटाची कार्यक्षमता वाढविली. तयार केलेला सौरघट हा स्थिर स्वरूपाचा असून जास्त काळ टिकणारा आहे. याच बरोबर सल्फाईड सल्फाईडचा वापर करून अतिशय कमी वेळेत मिथाईला ऑरेंज (रंगद्रव्य) यासारख्या द्रव्यांचा सूर्यप्रकाशाच्या मदतीने वीस मिनिटाच्या आत विघटन होते. हा रंगद्रव्य मनुष्यप्राण्याला व वनस्पतींसाठी घातक असल्याने त्याचे विघटन होणे गरजेचे आहे. दुर्गम भागातही अगदी कमी प्रकाशात हा सौर घट आपली कार्यक्षमता दाखवतो. अशा प्रकारचे बहुउपयोगी संशोधन पहिल्यांदाच झाले असून याबद्दल डॉ. गरडकर व संशोधक विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी नॅनो मटेरियल्सचा वापर
डॉ. गरडकर यांनी आपल्या प्रयोगशाळेत विविध नॅनो मटेरियल्स तयार केली आहेत. यामध्ये झिंक ऑक्साईड, टिटॅनियम ऑक्साईड, गोल्ड आणि सिल्वर नॅनो पार्टिकल्स यांचा समावेश आहे. नॅनो मटेरियल्सचा उपयोग त्यांनी रंग मिश्रित पाणी शुद्ध करणे, कॅन्सरवरील उपचार तसेच बीज रोपण करण्यासाठी केला आहे. त्यात कृषी विभागातील नॅनो मटेरियलचा वापर करून बीज उगवण प्रक्रिया हा शोध नव्याने सुरू केला आहे. या नविन तंत्रज्ञानामुळे कृषी उत्पादकता वाढल्याचे दिसून येत असून त्याचा उपयोग शेतकरी बांधवासाठी होणार आहे.
कॅन्सर सेल मारण्यासाठी सिल्वर गोल्डचा वापर
नॅनो मटेरियलमध्ये सिल्वर अँड गोल्डचा समावेश आहे सिल्वर अँड गोल्डच्या पार्टीकलमध्ये पर्यावरण पूरक पद्धतीचा अवलंब करून अतिशय सूक्ष्म कण तयार केले आहेत. यामध्ये झाडाच्या पानापासून नॅनोपार्टीकल्स करून त्याचा वापर अँटीबॅक्टेरियल म्हणून उपयोग केला आहे. सिल्वर गोल्डचा वापर कॅन्सर सेल्स मारण्यासाठी देखील केला जातो, या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, गोल्डन पार्टिकल हे फक्त कॅन्सर सेल मारतात व नॉर्मल सेल्सना अजिबात इजा होत नाही हे गोल्डन पार्टिकलच्या कामाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
डॉ. गरडकर यांचा जागतिक संशोधनाच्या क्रमवारीत समावेश
डॉ. गरडकर हे रसायनशास्त्र अधिविभागात 2008 पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. औद्योगिक रसायनशास्त्र विभागात तीन वर्ष समन्वयक म्हणून काम पाहिले. जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत टू पर्सेंटेजमध्ये त्यांच्या संशोधनाचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठ अधिविभाग व संलग्न महाविद्यालयातील केमिकल संशोधकांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर 160 हून अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. समाजोपयोगी नॅनोमटेरियल्स तयार करून त्याचे उपयोग तपासले जातात. त्यांनी विद्यापीठातील प्रयोगशाळेत टीआय ओटू सारखे मटेरियल तयार करून विषारी रंगद्रव्याचे विघटन केले आहे.
पंचगंगेचे पाणी शुद्ध करण्यासाठी नॅनो मटेरियलचा वापर
कारखान्याचे अशुद्ध व कपडे रंगवून उर्वरीत पाणी पंचगंगेत सोडले जाते. या रंगद्रव्यांमुळे मासे, जलचर प्राणी मरतात. ऐवढेच नाही तर जनावरे आणि माणसांनाही हे पाणी अपायकारक ठरू शकते. रंगद्रव्याचे पाणी एकत्रित करून नॅनो मटेरियलच्या मदतीने रंगद्रव्यांचे विघटन करून पाणी शुद्ध करता येते. शुद्ध केलेले पाणी पिणे व वापरासाठी उपयोगी ठरू शकते.