Tarun Bharat

विद्यापीठाचा विद्यार्थी न्यायमुर्ती अभिमानास्पद गोष्ट

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे गौरद्गार : न्यायमुर्ती अमित बोरकर यांचा विद्यापीएातर्फे सत्कार

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अमित बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होणे, ही विद्यापीठ परिवाराबरोबरच समस्त कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी काढले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अमित बोरकर यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या न्या. बोरकर यांनी विद्यापीठाच्या वकीलांच्या पॅनलवरही अत्यंत प्रभावी पद्धतीने काम केले. आपल्या कर्तबगारीच्या बळावर त्यांनी न्यायमूर्ती पदापर्यंत झेप घेतलेली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा विद्यापीठ परिवारास अभिमान वाटतो. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, विद्यापीठाचे वकील म्हणून काम केल्यानंतर पुढे न्यायमूर्ती होण्याची एक परंपरा निर्माण झाली आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयही त्यास अपवाद राहिलेले नाही. त्यातही न्या. बोरकर हे विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा आनंद वेगळा आहे.

न्या. बोरकर सत्कारास उत्तर देताना म्हणाले, विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान सदैव माझ्या मनात आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाचा वकील म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, ही बाबही महत्त्वाची ठरली. हे काम करीत असताना विद्यापीठ प्रशासनाचे आणि सर्वच अधिकाऱयांचे अमूल्य सहकार्य लाभले. विद्यापीठाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती हे येथील अधिकारी-कर्मचायांचे गुणवैशिष्टय़ मला भावले. स्वागत व प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. विधी अधिकारी ऍड. अनुष्का कदम यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी विभा अंत्रेडी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

युवा आमदारांनी भाजप संस्कृतीवर डागली तोफ

Archana Banage

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचा आदमापुरात उत्साहात प्रारंभ

Archana Banage

उजळाईवाडीतील हॉस्पिटलने बिलासाठी १४ तास बॉडी अडविली

Archana Banage

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

Archana Banage

अभिनंदन…पण इतक्यावर थांबू नये

Archana Banage

गडहिंग्लजच्या सराफास 3 लाख 21 हजाराला गंडा

Archana Banage
error: Content is protected !!