Tarun Bharat

बालविवाह रोखण्यात शिवाजीनगर पोलीस ठाणे रोल मॉडेल

गेल्या महिन्याभरात पाचहून अधिक बालविवाह रोखण्यात यश

संजय खुळ, इचलकरंजी
Child Marriage Kolhapur News : बालविवाह रोखण्यात व समाजात जागृती करण्यासाठी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कार्य रोल मॉडेल ठरत आहे. गेल्या महिन्याभरात पाचहून अधिक बालविवाह रोखण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अन्य संबंधित विभागाला यश आले आहे. यातून अनेक लहान मुलींचा विवाह थांबण्याबरोबरच कायदेशीर कारवाई होण्यापासून अनेक कुटुंबांची सुटका झाली आहे.

बालविवाहाबाबत शासन पातळीवर आता अधिक प्रभावीपणे काम सुरू आहे.जिल्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी दाखवलेली अधिक सजगता महत्त्वपूर्ण ठरत आहे. अनेक ठिकाणी बालविवाह होत असतात.याबाबतची माहिती प्रशासनाला मिळते.परंतु त्याबाबत पुढील कार्यवाही होतेच की नाही याची नागरिकांना फारशी शाश्वती नसते.त्यामुळे असे प्रकार घडत असतील तरी नागरिक ही माहिती देण्यास पुढे येत नाहीत.परंतु शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांची आता जागरूकता निर्माण झाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आतापर्यंत गेल्या दोन महिन्यांत पाचहून अधिक बालविवाहांबाबत कार्यवाही झाली आहे.यामध्ये अनेक प्रकरणात लग्न होण्यापूर्वीच संबंधित कुटुंबातील लोकांचे प्रबोधन करून होणारा विवाह पुढे ढकलण्यात प्रशासनाला यश आले आहे.

बालविवाह होत असल्याची माहिती सध्या टोल फ्री क्रमांकवरून पोलिसांना मिळत आहे.याशिवाय शिवाजीनगरचे निर्भया पथक,काही नागरिकांची सजगता आणि बालविकास प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचीही कामगिरी मोलाची ठरत आहे.शिवाजीनगर पोलिसांनी काही विवाह होण्यापूर्वीच रोखले आहेत तर झालेल्या विवाहाबाबत कायदेशीर प्रक्रिया ही सुरू केली आहे.एवढेच नव्हे तर बालविवाह झाल्यानंतर संबंधित मुलगी अल्पवयीन असल्यास व ती गर्भवती असल्यास त्याबाबत पोक्सो कायद्यांतर्गत ही कारवाईची एक केस दाखल केली आहे.त्यामुळे नागरिकांना आता बालविवाहामुळे आपण कोणत्या प्रक्रियेत अडकू शकतो याची माहिती समजू लागली आहे.

इचलकरंजी पोलीस शहराच्या हद्दीत तीन पोलीस ठाणे आहेत.त्यामध्ये शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी वाघमारे यांनी बालविवाहबाबत दाखवलेली तत्परता महत्त्वपूर्ण ठरत आहे. अशा प्रकरणात संबंधित विभागाला तातडीने माहिती देऊन त्याबाबतची कार्यवाही अधिक जलद गतीने झाली आहे त्यामुळेच बालविवाहाबाबत या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिक प्रकरणे दाखल झाले आहेत.वास्तविक शहराच्या अन्य भागातील असे प्रकार होतच नाहीत असे नाही. परंतु शिवाजीनगर पोलिसांनी दाखवलेली सतर्कता अधिक महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणे प्राकर्षाने पुढे दिसून येत आहेत.

नागरिकांचे प्रबोधन
पोलिसांनी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्यानंतर नागरिकांना बालविवाह बाबत अनेक वेळा माहितीच नसल्याचे पुढे आले आहे. बालविवाह केल्यानंतर कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा बालविवाहानंतर अन्य कोणत्या कायदेशीर प्रक्रियेत संबंधित मुलगा किंवा मुलगी अडकू शकते याबाबतचे ही माहिती देण्यात येत आहे. होणारे प्रबोधन अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे.

ज्योती पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारीप्रशासनाशी संपर्क साधा

बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास पोलीस प्रशासन संबंधित विभागाच्या सहकार्याने तातडीने कार्यवाही करत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकरणात माहिती देऊन समाज जागृतीसाठी पुढाकार घ्यावा. यापुढील काळात कोपरा सभा व अन्य माध्यमातून बालविवाहाची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न राहील.

-शिवाजी वाघमारे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर इचलकरंजी

Related Stories

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; कोल्हापुरातील एकावर गुन्हा नोंद

Archana Banage

मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून सहभागी – चंद्रकांत पाटील

Archana Banage

ईश्वर अल्ला तेरो नाम…

Archana Banage

सोन्यांच बाशिंग अन लगीन देवाचं लागलं…

Archana Banage

अंतिम वर्षाची परिक्षा असणार बहुपर्यायी स्वरुपाची

Archana Banage

Kolhapur : शेतकऱ्यांसह उद्योगांनाही जिल्हा बँकेचे पाठबळ

Abhijeet Khandekar