एसडीपीआयचा आरोप : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडले आहे, असे जे सांगण्यात येत आहे ते चुकीचे आहे. हा आरएसएसचा अजेंडा असून बाबरी मशिदप्रमाणे ज्ञानवापी मशिदही ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप येथील एसडीपीआयच्यावतीने करण्यात आला आहे. याबाबत पत्रक काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे.
वाराणसी येथे ज्ञानवापी मशिद आहे. त्या ठिकाणी शिवलिंग सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक ही संपूर्ण मशिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्या मशिदीला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तो थांबला पाहिजे. 1991 पासून त्या ठिकाणी हा प्रयत्न सुरू आहे. आरएसएसने जाणूनबुजून हे प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून सर्व इतर पक्षांनी त्याला विरोध करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एसडीपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.