Tarun Bharat

शिवपाल सिंगवर तीन वर्षांची बंदी

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा ऍथलिट आणि भालाफेक धारक शिवपाल सिंग हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने (नाडा) त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बंदीचा कालावधी 21 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाल्याने आता शिवपाल सिंगवर तीन वर्षांच्या कालावधीसाठी बंदी अंमलात आणली जाईल.

उत्तर प्रदेशच्या ऍथलिट 27 वर्षीय शिवपाल सिंगने 2019 च्या आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. तसेच त्याने 2019 साली विश्व सेनादल क्रीडा स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक घेतले होते. 2022 च्या ऍथलेटीक हंगामात उत्तेजक चाचणीत दोषी आढळणारा शिवपाल सिंग हा भारताचा पाचवा ऍथलिट आहे. यापूर्वी नवजीत कौर धिलाँ, धावपटू धनलक्ष्मी शेखर, एम. आर. पुवम्मा तसेच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेली कमलप्रित कौर उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने या सर्व भारतीय ऍथलिटस्वर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.

Related Stories

भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 खेळणार

Patil_p

सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कारासाठी रोनाल्डो, मेसी यांच्यात चुरस

Patil_p

भारत-द. आफ्रिका महिलांच्या टी-20 मालिकेला आज प्रारंभ

Patil_p

राजस्थानचा केकेआरविरुद्ध ‘रॉयल’ विजय

Patil_p

टी-20 : न्यूझीलंड-विंडीज आज आमनेसामने

Patil_p

टी-20 मानांकनात श्रेयसची प्रगती, यादव स्थिर

Patil_p
error: Content is protected !!