गुंतवणूकदार समिटचे निमंत्रण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गुंतवणूकदार समिटचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने ही भेट घेतल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांना देण्यात आली. या भेटीत राज्यातील विकासकामे आणि नव्या प्रकल्पांबाबत चर्चाही झाल्याचे समजते. मध्यप्रदेश सरकारचे सुशासन उपक्रम आणि त्यांच्या परिवर्तनात्मक योजना लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल कसा आणत आहेत यावर चर्चा करण्यात आली, असे ट्विट करण्यात आले आहे.