Tarun Bharat

ठाकरे आणि शिंदे यांच्यात होणार पहिली लढत; अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून उमेदवारी जाहीर

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात पहिली लढत होणार आहे. यासाठीचं पहिलं पाऊल उद्धव ठाकरेंनी टाकलं आहे. अंधेरी पूर्वमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे शिंदे गटाने कोणतीही खेळी करण्याआधी ठाकरेंनी तिथे उमेदवार जाहीर केला आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवाराची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्वमधून शिवसेना आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latke यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही असित्वाची लढाई असणार आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्वमधून भाजपकडून उमेदवारी जाहीर होऊ शकते. या उमेदवाराला शिंदे गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ऋतुजा लटके यांनी काल, सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या जागेवर केव्हाही निवडणूक जाहीर होऊ शकते. सेनेत बंडखोरी झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

Related Stories

भाजपमध्ये घराणेशाहीला विरोधच: पंतप्रधान मोदी

Abhijeet Shinde

सागर राणाच्या पीएम अहवालानंतर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

Abhijeet Shinde

मुंबईतून उड्डाण केलेल्या अलायन्स एअरच्या इंजिनचे आवरण कोसळले

datta jadhav

वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव, आमच्याकडे सबळ पुरावे

prashant_c

डॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन उभारावे : जावळे

Patil_p

‘अजिंक्यतारा’ कोण सर करणार

datta jadhav
error: Content is protected !!