बेळगाव / प्रतिनिधी :
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या सुंदर सार्वजनिक गणेश मूर्ती स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवारी करण्यात आले. कपिलेश्वर चौक येथील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात हा कार्यक्रम पार पडला. शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकार्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
उत्तर विभाग – प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कपिलेश्वर चौक, द्वितीय – कंग्राळगल्ली गणेशोत्सव मंडळ, तृतीय – सम्राट अशोक चौक गणेशोत्सव मंडळ, चतुर्थ – शनिवारखुट गणेशोत्सव मंडळ, पाचवा कडोलकर गल्ली गणेशोत्सव मंडळ, दक्षिण विभाग – प्रथम राजहंस गल्ली अनगोळ गणेशोत्सव मंडळ, द्वितीय वझे गल्ली वडगाव गणेशोत्सव मंडळ, तृतीय – कारभार गल्ली वडगाव गणेशोत्सव मंडळ, चतुर्थ – खासबाग संभाजी रोड गणेशोत्सव मंडळ, पाचवा- सराफकट्टा शहापूर गणेशोत्सव मंडळाने पटकाविला. दोन्ही विभागात विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, उप शहर प्रमुख राजु तुडयेकर, प्रवीण तेजम यांच्या हस्ते मानचिन्हाचे वाटप करण्यात आले. यावेळी महेश टंकसाळी, राजु कणेरी, प्रकाश हेब्बाजी, निरंजन अष्टेकर, प्रदीप सुतार, विजय मुकु&टे, बाळासाहेब डंगर्ले, मयुरेश काकतकर, लक्ष्मण चतूर यासह इतर उपस्थित होते.