Tarun Bharat

Shivsena Dasra Melava : शिवसैनिक शिवतीर्थावर जाणार!

शिवसेना प्रमुख संजय पवार यांची माहिती; मुंबईतील मेळावा अभूतपूर्व असेल

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील मेळाव्याला 56 वर्षांची परंपरा आहे. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे विचार मांडतात त्यातून ऊर्जा घेऊन शिवसैनिक वर्षभर कार्य करत असे. तीच परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसैनिकांनी जपली आहे. आजच्या शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्हय़ातून आठ ते दहा हजार शिवसैनिक जाणार आहेत. त्यातील काहीजण मंगळवारी बस, खासगी कार, ट्रव्हल्सने गेले आहेत. काही आज सकाळी रवाना होणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात काय बोलणार?, कोणता विचार, संदेश आणि आदेश देणार? याकडे साऱया शिवसैनिकांच्या नजरा आहेत. त्यामुळे प्रतिवर्षीपेक्षा यंदाच्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी होणार आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असून काही जण आज पहाटे रवाना होणार आहेत.

आमचा मेळावा, त्यांची सहल
शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर प्रेम करणाऱया शिवसैनिकांचा आज शिवतीर्थावर मेळावा आहेत. त्यासाठी शिवसैनिक आसुसलेला आहे. मात्र विरोधकांचा मेळावा म्हणजे मुंबईची सहल आहे. त्यांना मेळाव्यासाठी माणसे मिळत नसल्याने ते ट्रव्हल बुक करून मुंबईच्या सहलीसाठी माणसे नेत आहेत. त्या माणसांना आपण कुठे जात आहोत हे माहिती नाही, अशा शब्दात जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीकास्त्र सोडले.

Related Stories

कोल्हापूर : बालिंगेची राष्ट्रीय पेयजल अंधारात

Archana Banage

प्रश्न सुटणार नसतील तर बैठक कशाला बोलविली? खासदार संतप्त

Archana Banage

संदीप मागाडे खून प्रकरणातील सुत्रधार कुमार कांबळेला अटक

Archana Banage

सीपीआर आग चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन

Archana Banage

मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

Archana Banage

महिला कर्जमुक्त झालीच पाहीजे!

Archana Banage
error: Content is protected !!