Tarun Bharat

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या अडचणीत वाढ, शिवसेनेने केली ‘ही’ घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यसभेला शिवसेना दोन उमेदवार देणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. परीवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणार आणि तो कसा निवडून येणार यासंदर्भात पक्ष बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही परब यांनी सांगितले आहे.

३ मे रोजी राज्यसभा खासदारकीची टर्म संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. त्यावर राष्ट्रवादिचे नेते शरद पवार यांनी सोमवारी महाविकास आघाडीकडून पाठिंब्याची घोषणा केली असताना, शिवसेनेने मात्र संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वप्नांना दणका दिला आहे. शिवसेना राज्यसभेसाठी सहावा उमेदवार देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट निर्माण झाला असून, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेसाठी शिवसेना दोन उमेदवार देणार?

अनिल परब पुढे म्हणाले, संभाजीराजेंच्य़ा पाठिंब्याबाबत पक्ष निर्णय घेईल. निवडणूका कधी घ्यायच्या याचा सर्वस्वी निर्णय निवडणूक आयोगाचा आहे असेही स्पष्ट केले. यासाठी निवडणूक आयोग लागणाऱ्या सर्व यंत्रणांची आणि हवामान विभागाची माहिती घेईल असेही त्यांनी सांगितले.

संभाजीराजेंच्य़ा पाठिंब्याबाबत पक्ष निर्णय घेणार

ज्याअर्थी शिवसेना दोन जागा लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार नाही हे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट होत आहे. कारण सहा जागा आहेत त्यातील प्रत्येकी एक-एक जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला मिळत होत्या. मात्र शिवसेनेने दोन जागा लढवणार हे स्पष्ट केल्याने आता सहाव्या जागेवर शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. यामुळे संभाजीराजेंना पाठिंबा मिळणार नाही.

Related Stories

शाळा बंदमुळे स्कूल बसच्या चाकांना पुन्हा ब्रेक

Abhijeet Khandekar

अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करावे – ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

Archana Banage

साताऱयातील पहिली महिला ‘बॉम्ब टेक्निशन’ मोना निकम

Patil_p

आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू? दीपक केसरकरांच्या विधानामुळे नवा ट्विस्ट

Rahul Gadkar

टाटा एअरबसनंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर,सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर शिंदे- फडणवीस सरकावर

Archana Banage

अनिल अंबानी विकणार वीज कंपन्यांमधील हिस्सा

datta jadhav