Tarun Bharat

शिवसेनेकडून पक्षादेश जारी, आमदारांना व्हीप लागू

Advertisements

मुंबई- २४ वर्षानंतर राज्यसभेसाठीची लढत अत्यंत चुरशीने होताना पाहायला मिळत आहे. एकही मत फुटू नये यासाठी खबरदारी म्हणून सेनेने आमदार मुंबईत बोलावले आहेत. आज या सर्व आमदारांना राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला असून पक्षाने दिलेल्या निर्देश आणि आदेशानुसार मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. १० जून रोजी मतदानात सहभागी होण्यासाठी विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी आठ वाजता हजर रहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून पक्षादेश जारी, आमदारांना व्हीप लागू

काय लिहले आहे पक्षाध्यक्ष पत्रात?
राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवार दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरता सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश आणि सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे. अत: शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांना कळवण्यात येते की, सदस्यांनी उपरोक्त दिवशी वेळेवर उपस्थित राहून पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मतदान करावे,

सेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक

राज्यसभेची निवडणुकीसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. गेल्या २४ वर्षानंतर प्रथमच हि निवडणूक लागली आहे. यंदा या निवडणूकीत कोल्हापूर केंद्रस्थानी आले आहे. दोन्हीही उमेदवार कोल्हापूरचे असून शिवसेनेकडून कट्टर कार्यकर्ते संजय पवार तर भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. विजयासाठी प्रत्येकाला किमान ४२ मतांची गरज आहे. त्यांनी एक-एक मत दोन्ही पक्षांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे शिवसेनेने खबरदारी म्हणून आमदारांना व्हीप बजावला आहे.

Related Stories

फडणवीस हे देखील घराणेशाहीचंच प्रॉडक्ट – नवाब मलिक

Sumit Tambekar

आता मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच : शाहू छत्रपती

Abhijeet Shinde

युवकाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱया तिघांवर गुन्हा

Patil_p

हॉकीपटू ऐश्वर्याचे कोल्हापुरात जंगी स्वागत; महाराणी ताराराणी पुतळ्य़ाला अभिवादन

Abhijeet Shinde

कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 9 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

Patil_p

देहविक्री करणाऱ्या महिला शासकीय निधीपासून अजूनही वंचित

Rohan_P
error: Content is protected !!