Tarun Bharat

Eknath Shinde: शिवसेना नेतृत्वावर नाराज असलेले एकनाथ शिंदे आहेत तरी कोण?

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये फुट असल्याचं स्पष्ट होत आहे. निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच कालपासून ११ आमदारांसोबत एकनाथ शिंदे नाॅटरिचेबल होते. ते सुरत मधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याचे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार काय? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत पडलेली फूट ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे पडल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे आहेत तरी कोण? सेनेत त्यांना एवढे का महत्त्व आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. (Eknath Shinde Update News)


जाणून घ्या कोण आहेत एकाच शिंदे
आनंद दिघे (Shivsena leader Anand Dighe) यांच्यानंतर शिवसेना टिकवण्यात एकनाथ शिंदेंचं मोठं योगदान मानलं जात. एकनाथ शिंदे यांची ओळखच मुळात मितभाषी अशी आहे. 1980 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा प्रवेश होताच किसन नगरचे ते शाखाप्रमुख झाले. एक साधा शाखाप्रमुख या पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९७ साली त्यांना ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट मिळालं. त्यानंतर 2004 मध्ये एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून आले होते.

2009, 2014 आणि 2021 मध्ये ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेत पोहचले. त्यांचे वैशिष्ट म्हणजे 2014 च्या निवडणूकीत मोदी लाट आली असतानाही त्यांनी शिवसेना टीकवून ठेवण्यात आपला करिश्मा राखला. 2019 च्या सुरुवातीला त्यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.


शिवसेनेविषयी एकनाथ शिंदेंचे प्रेम
एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेत आनंद दिघे यांच्या माध्यमातून प्रवेश केला. आजतागायत त्यांनी कधीही पक्षांतर केलं नाही. २०१४ च्या मोदी लाटेतही त्यांनी सेनेचा गड राखण्यात प्रतिष्ठा पणाला लावली. दरम्यान आता राज्यसभा आणि विधानसभा यातील मविआच्या पराभवाने नाराज शिंदे भाजपात जातील का हे पाहावे लागणार आहे. कारण शिंदें यांच्यासोबत एकूण ३५ आमदार त्यांच्या सोबत असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 65 हजारांवर

datta jadhav

‘त्या’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथना फटकारलं

Abhijeet Shinde

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, लोकशाहीत अशी घटना अयोग्य- नवाब मलिक

Abhijeet Shinde

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या…

Abhijeet Shinde

जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग : भगत सिंह कोश्यारी

Rohan_P

सुप्रिया सुळेंनी नोंदवली 10 वीज उपकेंद्रांची ऑनलाईन मागणी

Rohan_P
error: Content is protected !!