Tarun Bharat

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? उच्च न्यायालयात आज सुनावणी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patrachal Land Scam) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत याचिका दाखल केलीय. संजय राऊतांचा जामीन रद्द व्हावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ईडी संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. राऊत यांच्याविरोधात पुरावे असूनही सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतलीय. आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टानं ईडीला धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आणि संजय राऊत १०० दिवसांनी तुरुंगाबाहेर आले.

हे ही वाचा : Amitabh in high Court : अमिताभ बच्चन यांची हायकोर्टाच धाव; आपल्या प्रतिमेला मागितले संरक्षण

कोर्टाने पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक केल्याचं म्हणत ईडीला चांगलंच सुनावलं आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं.

Related Stories

LPG सिलिंडर 265 रुपयांनी महागला

datta jadhav

BREAKING: ३० जूनला ठाकरे सरकारची परीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

Rahul Gadkar

राज्यात शंभर पोलिसांना कोरोना,दोघांचा मृत्यू तरीही १२ तास ड्यूटी

Archana Banage

..त्याचं तत्परतेनं बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात : आमदार पडळकर

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरण्याची गती होतेय संथ

Archana Banage

अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये अखेर जळगावला रवाना हंगामी अधिष्‍ठातापदी डॉ. आरती घोरपडे

Archana Banage