ऑनलाईन टीम/ तरूण भारत
ईडीने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते. ईडीने आज संजय राऊतांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात ED Office) हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज संजय राऊत संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. याआधी संजय राऊत यांनी ‘मी पळपुटा नाही, ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार. केंद्रीय तपास यंत्रणांवर माझा पूर्ण विश्वास आहे. चौकशी वेळी मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. तसेच पत्राचाळ कोठे आहे हे मला माहित नाही”, असं संजय राऊत यांनी ईडी कार्यलायाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.