Tarun Bharat

शिंदे गटाच्या व्हिपमुळे सेना आमदार अडचणीत?

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

राज्याच्या विधिमंडळात थोडय़ाच वेळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हीप जारी केला आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे, असा पक्षादेश काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने हा पक्षादेश धुडकावून लावत नवीन व्हीप जारी केला आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवर शिंदे गटाने हा व्हीप बजावला असून, यामध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश काढला आहे. विधिमंडळाच्या नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही दावा करत असल्याने सेना आमदार अडचणीत येण्याची आणि कायदेशीर घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून शिंदे गटाचे प्रदोत भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये ठाकरे गटातील 16 आमदारांसह सर्व आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये ‘व्हिप-वॉर’ सुरू आहे.

शिंदे गटात शिवसेनेचे 39 आमदार असून, एकनाथ शिंदे या आमदारांचे गटनेते आहेत. या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हिप शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना लागू असेल, असा शिंदे गटाचा दावा आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असलेल्या 16 आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केल्यास 16 आमदारांचं सदस्यत्व धोक्यात येईल, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. दरम्यान, यासर्व पार्श्वभूमीवर नेमका कोणाचा व्हिप वैध राहणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

बाईक रायडिंगमध्ये विक्रम करत पत्नीच्या आठवणींना उजाळा

Patil_p

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्ण एक, अख्ख गाव लॉकडाऊन

Archana Banage

पंचगंगा पात्राबाहेर, एनडीआरएफ तैनात, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

Rahul Gadkar

साताऱयात उद्या मोफत महालसीकरण

Patil_p

राजू शेट्टी हे होमपिचवर भुईसपाट

Archana Banage

कोरोनाचे नियम मोडणाऱयांकडून 11 लाखांचा दंड वसूल

Patil_p