ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने कुर्ल्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. रजनी कुडाळकर (Rajani Kudalkar) (वय, 42) असे त्यांचे नाव आहे.
मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. रजनी या कुडाळकर यांची दुसरी पत्नी होत्या. कुर्ल्याच्या नेहरू नगरमधील राहत्या घरी रात्री 9 च्या सुमारास त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित असून, रजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कुडाळकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस तपास करत आहेत.