ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेतील या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे हे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिंदे गटाने चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे. (shivsena symbol eknath shinde uddhav thackeray claims for partys bow and arrow poll symbol)
दरम्यान, शिंदे यांनी शिवसेनेच्या घटनेला निवडणूक आयोगापुढे आव्हान देत शिवसेना चिन्ह्याबाबत लवकर निर्णय घेऊन हे चिन्ह आम्हाला प्रदान करावे किंवा तात्काळ गोठवावं अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हाला तातडीने मिळावे किंवा याबाबत तातडीने काही आदेश द्यावा अशा शब्दांत प्रसंगी धनुष्यबाण चिन्ह (ShivSena Symbol) गोठवण्याची अप्रत्यक्ष मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली आहे.
हे ही वाचा : लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण राजकीय हेतूने प्रेरित- खासदार अधीर चौधरी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट आज निवडणूक आयोगाला भेटणार असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गटाकडून शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर आज (शनिवारी) केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता होती. पण आज धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.