Tarun Bharat

एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर,”जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता शिवसेना व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं आपापल्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क तर एकनाथ शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. यातच एकनाथ शिंदे गटानं दसरा मेळाव्याचा व्हिडिओ टीझरही शेअर केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून काल मेळाव्याचा व्हिडिओ टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यात बाळासाहेबांचं हिंदुत्व जपण्याची ग्वाही देण्यात आली आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार… हे शिवसेनेचं घोषवाक्य त्यात समाविष्ट करतानाच ‘एक लव्य आणि एक नाथ’ या शब्दांची जोडही देण्यात आली आहे. आनंद दिघे यांचा फोटोही व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे. यांनतर ठाकरे गटाकडूनही मेळाव्याचा व्हिडिओ टीझर शेअर केला आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) अधिकृत ट्विटर हँडलवर हा टीझर ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे.

विशेष म्हणजे या ३५ सेकंदाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे सभेसमोर भाषण देतानाचे फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित जनसमुदायाचे चित्रणही ठळकपणे दाखवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राची ताकद दिसणार असंही म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या,” असं आवाहन केलं.

Related Stories

कुपवाडमध्ये तरुणाची मराठी शाळेच्या आवारात गळफासाने आत्महत्या

Archana Banage

सांगली : पशुवैद्यकीय पदविका धारण करणाऱ्यांना सहकार्यासाठी सेवेत घ्या

Archana Banage

वीस टक्के कोरोनाबाधितांचा हृदयविकाराने मृत्यू

Archana Banage

चीन अन् भारत यांच्यात आज सैन्यस्तरीय चर्चा

Patil_p

“परवानगीशिवाय मांस विक्री नको ”; भाजप आमदाराचा इशारा

Archana Banage

भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा

datta jadhav
error: Content is protected !!