Tarun Bharat

रामदास कदमांविरोधात शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

पुणे / प्रतिनिधी :

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून, रामदास कदमांविरोधात बुधवारी पुण्यातील स्वारगेट चौकात शहर शिवसेनेच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

माजी मंत्री रामदास कदम हे शिंदे गटात सहभागी झाल्यापासून ते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत आहेत. कदम यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याबद्दलही वादग्रस्त विधाने केल्यामुळे संतापाची लाट उसळली असून, कदमांविरोधात मोठय़ा संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. स्वारगेट येथे जोरदार घोषणाबाजी करीत कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिमेला जोडेही मारण्यात आले.

अधिक वाचा : न्हावाशेवा बंदरावर 1725 कोटींचे हेरॉईन जप्त

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी केले. या वेळी बोलताना ते म्हणाले, ज्या मातोश्रीने राज्यभरातील शिवसैनिकांना आधार दिला. त्याच मातोश्रीबद्दल बंडखोर रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात शिवसेना स्टाईलने रामदास कदम यांचा समाचार घेतला जाईल, असा इशारादेखील या वेळी देण्यात आला.

Related Stories

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा : डॉ.दीपक म्हैसेकर

Tousif Mujawar

पुणे विभागातील कोरोना रुग्णांची संख्या 92, 065 वर

Tousif Mujawar

१ ऑगस्टपासून कॉलेजही होणार ऑनलाईन

Archana Banage

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

datta jadhav

२६/११ चे दहशतवादी अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत; जावेद अख्तर यांची पाकिस्तानमध्ये जाऊन टिका

Abhijeet Khandekar

राणेंवर पुण्यातही गुन्हा दाखल

datta jadhav