Tarun Bharat

शिवशाही बसमधील 21 लाखाचे दागिने लंपास

Advertisements

भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ः कवठे येथील हॉटेल परिसरातील घटना

वार्ताहर/ भुईंज

कोल्हापूरला नातेवाईकाच्या विवाहासाठी शिवशाही बसने निघालेल्या संजय कृष्णा गांजवे(रा.पिसोली पुणे) यांच्या जवळचे बॅगेतील 21 लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरटय़ाने कवठे (ता. वाई) येथील राज हॉटेलच्या परिसरातून चोरून नेल्याची घटना दि. 12 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली. याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संजय गांजवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते त्यांची पत्नी शुभांगी आणि सून ऋत्विका असे तिघे कोल्हापूरला दि. 12 रोजी शिवशाही बसने निघाले होते. सव्वा पाच वाजता शिवशाही बस कवठे गावच्या हद्दीत आल्यानंतर तेथील राज हॉटेल परिसरात थांबवली. चहा पिण्यासाठी तिघेही खाली उतरले. चहा पिऊन प्रेश होऊन पुन्हा बसमध्ये बसले. रात्री 8.30 वाजता बस कोल्हापूरला पोहचली. तेथे बॅगा घरी गेल्यावर तपासण्या केल्या त्यावेळी त्यांच्या पत्नीला दागिने सापडले नाहीत. त्यांच्या सुनेच्या ही रात्री 11 वाजता बॅगा तपासल्या पण तेथे ही दागिने आढळून आले नाहीत. दि. 13 रोजी पुन्हा पुणे येथे एसटीने ते पोहचले घरात दागिने शोधले. अपारमेन्टमधील लिफ्टमधील सीसीटीव्ही तपासणी केली. शिवशाहीमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. एसटी फक्त कवठे येथील राज हॉटेलमध्ये थांबली होती. तिथे बस 20 मिनिटे थांबली होती. बसमधून खाली उतरताना सुनेने सासूला विचारले की दागिने कुठे आहेत त्यावर सुनेने दागिने बसमध्ये बॅगेत आहेत असे सांगितले होते. या संभाषण ऐकून कोणीतरी बसमधून दागिने चोरले आहेत.

 त्यामध्ये 2 लाख 32 हजाराचे 47 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 2 लाख 57 हजाराचे टेम्पल डिझाइनचे 52 ग्रॅमचे गंठण, 2 लाख 20 हजार रुपयांचा 45 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, 1 लाख 55 हजाराचा सोन्याचा नेकलेस, 1 लाख 80 हजाराचा सोन्याचा नेकलेस, 2 लाख 96 हजाराच्या चार सोन्याच्या बांगडय़ा, 19 हजाराच्या दोन अंगठय़ा, 97 हजार रुपयांचे सोन्याचे दोन कंगण, 2 लाख 90 सोन्याच्या चार बांगडय़ा, 1 लाख असा सुमारे 21 लाख 46 हजार 708 रुपयांचा ऐवज चोरून नेला असून याचा तपास भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत. वरील घटनेची तक्रार सोमवार दि. 15 रोजी भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

Related Stories

सातारा : प्राथमिक शिक्षण विभागाची दोरी महिला अधिकाऱ्यांच्या हाती

Abhijeet Shinde

राधानगरी तालुक्यातील युवकाने नैराश्यपोटी दारूची नशा करून आत्महत्या प्रयत्न

Omkar B

कृषी विभागातर्फे 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत साठा मंजूर

Patil_p

#NashikOxygenLeak : बेपर्वाई झाली असेल तर सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं-राज ठाकरे

Abhijeet Shinde

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकाविनाच पार पडला दक्षिणद्वार सोहळा

Abhijeet Shinde

सुखःवार्ता; पंधरवड्यात दुसरी लाट ओसरतेय

datta jadhav
error: Content is protected !!