Tarun Bharat

शिवसृष्टी, बाळासाहेब ठाकरे स्मृतिशिल्पाचे लोकार्पण

Advertisements

रत्नागिरीत माजी खासदार संभाजीराजेंची उपस्थिती

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरातील मारूती मंदिर येथील शिवसृष्टी व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिशिल्पाचे लोकार्पण माजी खासदार संभाजीराजे यांच्याहस्ते करण्यात आल़े रविवारी रात्री 9 च्या सुमारास हा सोहळा पार पडल़ा कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी ड़ॉ ब़ी एन पाटील, ज़ि प अध्यक्षा डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची उपस्थिती होत़ी

रत्नागिरी शहरात मारूती मंदिर सर्कल येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्य़ाभोवती ज़े जे. स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ही शिवसृष्टी उभारण्यात आली आह़े  यामध्ये दोन हत्ती, 4 घोडेस्वार, मावळे 2 तोफा तसेच रायगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा 4 किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत़ क वर्ग पर्यटनस्थळ विकास कामांतर्गत मारूती मंदिर चौकाचा विकास करण्यात आला आह़े शहरातील इतर चौकांचेही सुशोभिकरण हाती घेण्यात आले आह़े

 एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर उदय सामंत रविवारी प्रथमच रत्नागिरीत येणार होत़े रायगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर असा दौरा करत सामंत यांना रत्नागिरीत पोहचण्यास विलंब झाल़ा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने संभाजीराजे यांनाही विलंब झाल़ा त्यामुळे लोकार्पण सोहळा कार्यक्रम सुमारे 3 तास उशिरा पार पडल़ा संभाजीराजे यांनी शिवसृष्टीचे लोकार्पण करत जास्त काही बोलण्यास नकार दिल़ा शिवसृष्टीच्या शेजारी क़ै बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीशिल्पाचे देखील लोकार्पण यावेळी पार पडले. यावेळी मंत्री सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा संख्येने रत्नागिरीकर मारूती मंदिर परिसरात एकत्र जमले होत़े

Related Stories

रत्नागिरी मतलई वाऱ्यांमुळे मासेमारी थंडावली

Abhijeet Shinde

रत्नागिरी : चारचाकी वाहनामधील मोबाईल चोरट्याने लांबवला

Abhijeet Shinde

आमदार नाईक यांच्या संपर्कात 200 हून अधिक व्यक्ती

NIKHIL_N

कंपन्या थेट कोकणच्या आंबा बागेत!

Patil_p

वाहनांची कोंडी अखेर दूर

NIKHIL_N

सायंकाळी मोबाईलवर वाजतो सायरन.. मग घराबाहेर पडण्यास मनाई

NIKHIL_N
error: Content is protected !!